कोंढव्यात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारा जेरबंद

1080

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन असतानाही पुणे शहरात छुप्या पद्धतीने तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या एकाला खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून 14 हजारांचा तंबाखुचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई कोंढवा बुद्रुक परिसरात करण्यात आली. अशोककुमार रामदेव यादव (वय 45, रा. कोंढवा, मूळ-गाजीपुर, उत्तर प्रदेश) असे जेरबंद करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संचारबंदीत अनेकांकडून अंमली पदार्थांची विक्री केली जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. कोंढव्यात बाबा तंबाखूची विक्री होत असल्याची माहिती संदीप साबळे यांना मिळाली. त्यानुसार खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अशोक कुमारला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, बाबा तंबाखूची विक्री करीत असल्याची कबुली त्याने दिली. ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल पिलाणे, संदीप साबळे, प्रकाश मोकाशी, उदय काळभोर यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या