रत्नागिरीत कोरोनामुळे एकाचा मृत्यू; बळींची संख्या 6 वर

503

रत्नागिरीत कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या 6 वर पोहचली आहे. मुंबईहून आलेल्या 49 वर्षांच्या व्यक्तीचा शनिवारी जिल्हा रूग्णालयात मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती मुंबईतून आल्यामुळे प्रशासन त्या व्यक्तीबाबत अधिक माहिती मिळवत आहे.

मुंबईतून 18 मे रोजी 49 वर्षांची ही व्यक्ती रत्नागिरीत आली होती. बरे वाटत नसल्याने 22 मे रोजी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. 23 मे रोजी त्याचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.त्या व्यक्तीवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाचा हा सहावा बळी आहे. सध्या रूग्णालयात 145 रूग्ण उपचार घेत असून 83 रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात नव्याने 26 रूग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांचा आकडा 234 वर पोहचला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या