जालन्यात वीज पडून एक जण जागीच ठार

सामना प्रतिनिधी । जाफराबाद

तालुक्यातील रास्तळ येथे वीज पडून एकाचा जागीच मृत्यू तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना आज दुपारी ३ वाजेच्या दरम्यान घडली आहे.

रास्तळ येथील एकनाथ नारायण डव्हळे हे शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता अचानक वीज त्यांच्या अंगावर कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत असलेले जगदेव शेषराव कदम हे किरकोळ जखमी झाले आहेत. जगदेव कदम यांच्यावर वरुड येथील सामान्य रुगालयात उपचार करण्यात आले आहे. एकनाथ डव्हळे यांच्या पश्चात दोन मुले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या