जम्मू कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात एक पोलीस शहीद

35

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरमधील झकुरा भागात शुक्रवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी पोलिसांच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात एक पोलीस अधिकारी शहीद झाला आहे. इम्रान टाक असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. या हल्ल्यात इम्रान अहमद हा जवान जखमी झाला आहे. अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे समजते.

शुक्रवारी संध्याकाळी झकुरा भागात काही पोलीस अधिकारी आणि लष्कराचे जवान गस्त घालत होते. त्याचवेळी एका सफेद रंगाच्या गाडीतून आलेल्या तीन दहशतवाद्यांनी पोलीस व जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात दोन पोलीस जखमी झाले. त्यापैकी एका पोलिसाचा रुग्णालयात उपचारादम्यान मृत्यू झाला तर एकावर अद्याप उपचार सुरू आहेत.

या हल्ल्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. पण दोन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी या भागात जवानांनी आणि पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली होती. शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी वापरलेली सफेद कार पोलिसांनी जप्त केली असून ती चोरीची असल्याची माहिती मिळत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या