कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान

25

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कश्मीरमधील बारामुला जिल्ह्यात जवानांनी शोधमोहीमेदरम्यान एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. हल्ला करण्याच्या तयारी असलेल्या दहशतवाद्यांना जवानांनी घेरा घालत ही कारवाई केली.

सीमेजवळील बारामुला जिल्ह्यातील उरी सेक्टरजवळ असणाऱ्या तुरना गावात दहशतवादी आणि जवानांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. प्राथमिक माहितीत चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आल्याची माहिती मिळत आहे. जवानांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून, शोधमोहीम सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या