पुलवामात चकमकीदरम्यान एक जवान शहीद, एक दहशतवादी ठार

452

जम्मू कश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सैनिक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली आहे. त्यात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आले असून एक जवान शहीद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुलवामा जिल्ह्यात गुसू गावात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. सुरक्षा दलाने तिथे शोधमोहीम हाती घेतली. तेव्हा दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलानेही गोळीबार केला. त्यात एक दहशतवादी मारला गेला. तसेच या चकमकीत एक जवानही शही झाला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या