मुंबईत 24 तासात 1 हजार 304 नवे रुग्ण; 58 कोरोनाबाधितांचा मृत्यू

641

मुंबईत गेल्या 24 तासात कोरोनाचे 1 हजार 304 नवे रुग्ण आढळले असून गेल्या 48 तासांत 58 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 1 हजार 454 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या आता 95 हजार 354 वर पोहोचली आहे.

मुंबईत 58 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण कोरोनाबाधित मृतांची संख्या आता 6 हजार 748 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 89 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या कमी होऊन आता 19 हजार 932 इतकी झाली आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 5 लाख 92 हजार 230 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 1 लाख 22 हजार 331 वर पोहोचली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या