वीज पडून एका महिलेचा मृत्यू तीन महिला जखमी

प्रातिनिधिक

भंडारा जिल्ह्याच्या मांगली सिहोरा येथे वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला तर तीन महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना सिहोरा येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सध्या शेतात धान रोवणीचे काम सुरू आहेत. महिला रोवणी करत असताना अचानक मेघ गर्जनेसह पावसाचे आगमन झाले. विजेचा कडकडाट सुरू झाला. इतक्यात शेतावर वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला तर तीन महीला गंभीर जखमी झाल्या. जखमी महिलांना ग्रामीण रूग्णालय सिहोरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या तिन्ही महिलांची प्रकृती स्थिर आहे. पण रोवणीच्या कामात मजूर महिलांचा जीव जात असल्याने आता महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.