बीड शहरात एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू; जिल्ह्यात कोरोनाचे 11 बळी

बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ होत असतानाच गेल्या दोन दिवसातच कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी किल्ला मैदान परिसरातील एका 75 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यात 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

बीड जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. बीड शहरात विविध भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. बीड शहरातील किल्ला मैदान भागात एका 75 वर्षीय महिलेचा पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. या महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती खालावल्यामुळे रविवारी पहाटे या महिलेचा मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्यात हा अकरावा बळी असून रविवारी 973 सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या