धाराशिव जिल्ह्यात कोरोनाचा सातवा बळी; कोरोनाबाधितांची संख्या 177 वर

635

धाराशिव जिल्ह्यात कोरोनाने सातवा बळी घेतला आहे. मुंबईहून तुळजापुर तालुक्यातील मांळुब्रा येथे आलेल्या 55 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेवर धाराशिव जिल्हा रुग्णालयात सुरू होते. कोरोनासोबतच या महिलेला उच्चरक्तदाब आणि मधुमेहाचाही त्रास होता. या महिलेच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 7 वर पोहचली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 177 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी 132 रुग्ण बरे झाल्याने त्यांना पाठवण्यात आले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 38 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या