नगर शहरात डेंग्यूने एका महिलेचा मृत्यू

नगर शहरातील कोठी येथील सुजाता सुरेश मकासरे (वय 45) या महिलेचा डेंग्यूने बुधवारी मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून त्या तापाने आजारी होत्या. शहरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. कोठी भागात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याने साथीचे रोग फैलावत आहेत.

कोठी भागातील स्वच्छता करण्याच्या मागणीसाठी प्रभागातील नागरिक जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. कोठी येथे अनेक भागात अस्वच्छता पसरलेली असून अनेक गटारी तुंबलेल्या आहेत. या समस्येकडे महापालिका प्रशासन व प्रभागातील नगरसेवक लक्ष देत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. साथीच्या रोगांपासून बचाव होण्यासाठी मनपा प्रशासनाने औषध फवारणी किंवा फॉगिंग केली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या