निपाहमुळे एका महिलेचा मृत्यू

42

सामना ऑनलाईन । कोची

केरळमधील कोझिकोडे जिल्ह्यात निपाहमुळे आणखी एका महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. कलायनी (६२) असे त्या महिलेचे नाव असून तिच्यावर गेले १२ दिवस उपचार सुरू होते. निपाहमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येत वाढ झाली असून हा आकडा १३ वर पोहोचला आहे. निपाह व्हायरसचा प्रभाव कमी होत असतानाच या महिलेचा मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा केरळमध्ये घबराट पसरली आहे.

केरळमधील कोझिकोडे व मल्लपुरम या जिल्ह्यांमध्ये निपाहची लक्षणे दिसत असलेले सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. जवळपास २०० हून अधिक रुग्णांना निपाह व्हायरसची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्यांच्यावर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. डोकेदुखी आणि ताप आलेल्या रूग्णांवर रूग्णालयांमध्ये विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या