एकाच वेळी दोन पुरुषांशी अनैतिक संबंध महिलेला पडले महागात, एकाने केली मुलीची हत्या

5970
murder-knife

एकाच वेळी दोन जणांशी अनैतिक संबंध ठेवणं एका महिलेला महागात पडलं आहे. त्यातील एकाने तिच्या मुलीची हत्या केली असून महिलेच्या पतीनेही आत्महत्या केली आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना हैदराबाद येथील आहे. गेल्या आठवड्यात एका पाच वर्षांच्या मुलीची हत्या झाली होती. ही मुलगी कल्याण राव नावाच्या माणसाची होती. कल्याणची पत्नी अनुषा हिची काही काळापूर्वी करुणाकर आणि राजशेखर अशा दोघांशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. काही काळाने तिचे या दोघांशीही अनैतिक संबंध निर्माण झाले. मात्र, त्या दोघांनाही दुसऱ्या माणसाविषयी माहीत नव्हतं.

आठवड्यापूर्वी करुणाकर अनुषाच्या घरी आला होता. तिथे त्याने राजशेखरला पाहिलं आणि त्यांच्यात वाद झाले. वादाचं रुपांतर कडाक्याच्या भांडणात झालं आणि त्या भांडणाच्या भरात करुणाकरने अनुषाची पाच वर्षांची मुलगी आध्या हिच्या गळ्यावर शस्त्र चालवून तिचा जीव घेतला. या प्रकरणी अनुषा, करुणाकर आणि राजशेखर या तिघांनाही अटक झाली. त्यानंतर अनुषाचा पती कल्याण राव यानेही ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली.

आपली प्रतिक्रिया द्या