एक वर्षाच्या बाळाची जगभ्रमंती; महिन्याला 75 हजार रुपयांची कमाई

एक वर्षाचं बाळ जगभरात फिरतो आणि दर महिन्याला हजारोंची कमाई करतो. काय, आश्चर्य वाटलं ना… या बाळाचं नाव ब्रिग्स आहे. अवघ्या एक वर्षाच्या वयामध्ये त्याने 45 वेळा विमानाने प्रवास केलाय. त्यातून तो एक हजार डॉलर म्हणजे 75 हजार रुपये कमावतो.

गेल्या वर्षी 14 ऑक्टोबर ब्रिग्सचा जन्म झाला. ब्रिग्सने अलास्कमध्ये अस्वल तर यलोस्टोन नॅशनल पार्कमधील लांडगे बघितले आहेत, अशी माहिती ब्रिग्सची आई जेस हिने दिली. ब्रिग्सचे इन्स्टाग्रामवर 30 हजार फॉलोअर्स आहेत. त्याची आई प्रवासावर ब्लॉग चालवते. त्यासाठी त्या प्रवास करतात. ब्रिग्सच्या जन्मानंतर करीअर संपुष्टात येईल अशी त्यांना भीती होती, मात्र पतीने त्यांना साथ दिली. जेस यांनी बेबी ट्रव्हेलबद्दल एक सोशल मीडिया अकाऊंट बनवले. जेस सांगतात, मी माझ्या बाळासोबत प्रवास करते आणि त्याचे अनुभव शेअर करते. त्यातून बाळाला सोबत घेऊन प्रवास करण्याची इच्छा असलेल्या अनेक पालकांना प्रेरणा मिळते.