पिंपळगाव-बसवंत येथे दोघांची हत्या करून एकाची आत्महत्या

15

सामना प्रतिनिधी, नाशिक

निफाड तालुक्यातील पिंपळगाव-बसवंत येथे रवींद्र नागमल (३५) याने पत्नी व नातलगाच्या दहावर्षीय मुलाची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली.

रवींद्र भटू नागमल (३५) हा पत्नी सुरेखा (३०), पत्नीच्या बहिणीचा मुलगा विशाल विजय पानपाटील (१०) यांच्यासमवेत पिंपळगाव बसवंत येथे राहत होता. आज सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत त्यांच्या घराचा दरवाजा उघडला न गेल्याने शेजारच्यांना संशय आला, त्यांनी घराच्या खिडकीतून डोकावून पाहिले असता तिघांचेही मृतदेह आढळले.

आपली प्रतिक्रिया द्या