भाजपची कण्णी कापण्यासाठी काँग्रेसने आणले राफेल पतंग

31

सामना ऑनलाईन । जयपूर

राफेल विमान खरेदी करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चार प्रश्न विचारले आहेत. मात्र अद्याप त्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली नसल्याने आता काँग्रेसने पतंगांवर ते प्रश्न छापले आहेत. राजस्थान काँग्रेसने राफेलवरील प्रश्न छापलेले पतंग लोकांमध्ये वाटले आहेत. राज्यातील प्रत्येक भागात या पतंग वाटण्यात येत असून त्याद्वारे पुन्हा एकदा काँग्रेसने भाजप व पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी काही दिवासांपूर्वी एक पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राफेल मुद्द्यावरून चार प्रश्न विचारले होते.
1. हवाई दलास 126 राफेल विमानांची गरज असताना 36 विमाने कशासाठी?
2. राफेलच्या विमानाची किंमत 560 कोटी असताना 1600 कोटी कशासाठी?
3. ‘एचएएल’ऐवजी अनिल अंबानी यांची कंपनी का?
4. मोदीजी, कृपया सांगा, पर्रीकरजी यांनी राफेलच्या फायली बेडरूममध्ये का ठेवल्या आहेत आणि त्यात काय आहे?
हे चार प्रश्न त्या पतंगांवर छापलेले आहेत. तसेच त्यावर ‘देश का चौकीदार चोर है’ असे देखील छापलेले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या