Breaking – कांद्याच्या निर्यातीवर बंदी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

671

केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या वाढच्या किंमती पाहता हा बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. कांद्याच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या भावाने पन्नाशी पार केली आहे्. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे बजट कोलमडले आहे. नवीन कांद्याची आवाक मंदावल्याने दिवाळीपर्यंत कांद्याचे भाव ‘शंभरी’ गाठणार अशी चिन्हे होती. त्याचमुळे केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या