137 रुपये किलो! कांद्याला मिळाला 70 वर्षातील उच्चांकी भाव

679

कोपरगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक घटली आहे. मंगळवारी 500 क्विंंटल कांदा मार्केट यार्डवर दाखल झाला. लिलाव सुरू होताच कांद्याच्या भावाने उसळी घेत प्रति क्विंटल 13 हजार 700 रुपयांचा टप्पा गाठला. कोपरगाव बाजार समितीतील 70 वर्षातील कांदा दराचे उच्चांक मोडीत काढले. नगर जिल्ह्यात विक्रमी दराचा मान मिळविल्याने शेतकरी व बाजार समिती प्रशासनात समाधानाचे वातावरण असल्याची माहिती सभापती संभाजी रक्ताटे व उपसभापती राजेंद्र निकोले यांनी दिली आहे.

कोपरगांव बाजार समितीत खुला कांदा लिलाव दैनंदिन सुरु असून बाजार समितीने केलेल्या आवाहनास शेतकरी वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी क्विंटलला रु 13700 असा भाव मिळाल्याने शेतकरी वर्ग खुश आहे. प्रतवारी नुसार भाव असा नं.1 रु 13550 ते 13700 नं.2 रु 11000ते 13500 तर खाद कांद्यास रु 3000 ते 4500 असा भाव मिळाला आहे.

शेतकरी वर्गाने आपला भुसार कांदा व डाळींब आदि शेती माल कोपरगांव बाजार समितीत विक्रीस आणताना तो प्रतवारी करुनच आणावा असे आवाहन सचिव परशराम सिनगर, विष्णु पवार, नाना रणशुर व संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या