अकरावी ऑनलाइन प्रवेश अखेर संपले,1 लाख 9 हजार जागा रिक्त

266

अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया अखेर संपली असून शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शुक्रवारी आतापर्यंत झालेल्या प्रवेशाचा तपशील जाहीर केला. अल्पसंख्याक, इनहाऊस आणि् व्यवस्थापन कोटा तसेच ऑनलाइन प्रक्रियेद्वारे एकूण 2 लाख 18 हजार 725 विद्यार्थ्यांनी अकरावीत प्रवेश घेतला आहे. या प्रवेश प्रक्रियेनंतरही तब्बल 1 लाख 8 हजार 71 जागा रिक्त आहेत.

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या एक द्विलक्षी, तीन सामान्य, एक विशेष फेरी व चार प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य अशा एकूण नऊ फेऱया पार पडल्या आहेत. सर्वाधिक प्रवेश हे वाणिज्य शाखेत झाले असून त्या खालोखाल सायन्स, आर्टस आणि एचएसव्हीसी शाखेचे प्रवेश आहेत, असे शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी स्पष्ट केले.

16 हजार विद्यार्थ्यांची ऑनलाइन प्रवेशाकडे पाठ
ऑनलाइन प्रवेशासाठी अर्ज केलेल्या 1 लाख 85 हजार 477 विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 69 हजार 864 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले असून 15 हजार 613 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे. व्यवस्थापन कोटय़ातून 8,647, अल्पसंख्यांक कोटय़ाद्वारे 30,575 इतर इन हाऊस कोटय़ाद्वारे 9639 प्रवेश झाले आहेत.

सर्वाधिक विद्यार्थी एसएससीचे
अकरावी एसएससी बोर्डाच्या 1 लाख 97 हजार 487 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. तर सीबीएसईचे 7 हजार 183 आणि आयसीएसई बोर्डाचे 10 हजार 124 विद्यार्थी आहेत. आयजीसीएसई 1206 आयबी 10 एनआयओएस 713 आणि इतर शिक्षण मंडळाच्या 2002 विद्यार्थ्यांनी अकरावीत ऑनलाइन अथवा कोटाद्वारे प्रवेश घेतला आहे.

अकरावीच्या जागांची स्थिती

एकूण प्रवेशक्षमता – 3,26,796
निश्चित झालेले प्रवेश – 2,18,725

शाखानिहाय झालेले प्रवेश
आर्टस – 21,627
कॉमर्स – 1,34,733
सायन्स – 59,109
एचएसव्हीसी – 3,256

आपली प्रतिक्रिया द्या