अकरावी प्रवेशाची वेबसाईट सुरू

अकरावी ऑनलाईन प्रवेशाची वेबसाईट अखेर शनिवारी रात्री उशिरापासून सुरू झाली आहे. मुंबई एमएमआर क्षेत्रात असलेल्या दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना 24 मेपर्यंत अकरावी प्रवेशाचा अर्ज भरता येणार आहे आणि सरावही करता येणार आहे. रविवारी दिवसभरात 6 हजार 662 विद्यार्थ्यांनी सराव नोंदणी केली.

अकरावी प्रवेश प्रक्रिया राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, नागपूर, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीत राबविण्यात येते. दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवडय़ात जाहीर होईल, अशी शक्यता असल्याने शनिवारपासून विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा अर्ज कसा भरायचा यासाठी सराव सुरू करण्यात आला. पहिल्याच दिवशी दिवसभर वेबसाईट सुरू झालेली नसल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. सकाळपासून साईड अंडर मेंटेनन्स असा मेसेज होता. अनेकांनी तक्रारी केल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा वेबसाईट सुरू झाली. यानंतर रविवारी 6 हजार 622 विद्यार्थ्यांनी आपले अर्ज नोंदणी केले होते, तर त्यापैकी  572 विद्यार्थ्याचे अर्ज अॅटो व्हेरिफायही करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना सराव 24 मेपर्यंत करता येणार आहे. याच कालावधीत महाविद्यालयांना आपल्या लॉगीनमध्ये  जागा व तुकडय़ासंदर्भातील नोंदणी करणार असल्याचे म्हटले आहे. ऑगस्टअखेरीस प्रवेश पूर्ण करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाचे आहे.

अकरावीची वेबसाईट  

https://mumbai.

11thadmission.org.in/