ऑनलाईन औषध विक्रीला दिल्ली उच्च न्यायालयाकडून बंदी

23

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली 

ई-कॉमर्स कंपन्याच्या माध्यमातून ऑनलाईन औषध विक्रीला सरकारने बंदी घातली आहे. ही बंदी संपूर्ण देशात लागू होणार आहे. त्यामुळे ई-कॉमर्स कंपन्याचे चांगलेच धाबे दणाणले आहे. यापूर्वी मद्रास उच्च न्यायालायाने ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी घातली होती. आता दिल्ली हायकोर्टानेही तोच निर्णय दिला आहे.

दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायाधीश राजेंद्र मेनन आणि व्ही.के. रॉय यांच्या खंडपीठाने एका जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान हा निर्णय दिला आहे. डर्मेटोलॉजिस्ट जही अहमद यांनी कोर्टात युक्तिवाद केला की अनेक ई-कॉमर्स वेबसाईट्सया दररोज डॉक्टरांच्या परवानगीशिवाय लाखो रुपयांची औषधं विकत आहेत. आणि ते रुग्णांसाठी धोकादायक आहेत तसेच डॉक्टरांनाही तितकीच धोकादायक बाब आहे.

ऑनलाईनवर कोणी कुठलेही औषध विकत घेऊ शकतातं तसेच ऑनलाईन औषध विक्री करणार्‍या कंपन्या कुठलेच नियम पाळत नसल्याचे समोर आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या