तुमच्या खात्यातील ३० टक्के रक्कमच सुरक्षित

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सहकारी बँका किंवा राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये एखाद्या खातेदाराची जेवढी रक्कम जमा असेल त्यापैकी फक्त ३० टक्के रकमेचीच गॅरंटी देण्यात आली आहे. त्यामुळे जर बँक बुडालीच तर तुमच्या एकूण जमा रकमेपैकी केवळ ३० टक्के रक्कमच तुम्हाला परत मिळणार आहे. बाकीची रक्कम बुडीत खात्यात जाईल. मग, भले तुमच्या खात्यात लाखो रुपये असू द्या, असा धक्कादायक खुलासा आरबीआयने आपल्या अहवालातून केला आहे. दरम्यान, देशभरातील सर्व प्रकारच्या बँकांमध्ये एकूण १०३ लाख कोटी रुपये जमा असून त्यापैकी केवळ ३०.५० लाख कोटी रुपयांचीच गॅरंटी देण्यात आली आहे.

आरबीआयच्या अहवालानुसार देशातील २१२५ बँकांमध्ये सप्टेंबर २०१७ पर्यंत १०३५३१ अब्ज रुपये म्हणजेच जवळपास १०३ लाख कोटी रुपये जमा आहेत. त्यातील केवळ २९.५ टक्के रक्कमच सुरक्षित आहे.