किरकोळ कारणाचा राग मनात धरून शस्त्र्ाास्त्र्ा घेऊन आलेल्या सातजणांनी 13 मार्च रोजी मध्यरात्री अश्विनकुमार मल्हारी मुळके (वय 30, रा. नवीन वसाहत, सांगली) याचा खून केला होता. यावेळी हल्लेखोरांनी शस्त्र्ाास्त्र्ाs नाचवित परिसरात दहशत माजविली होती. ही घटना नवीन वसाहत परिसरात घडली होती. या पार्श्वभूमीवर विश्रामबागची ओन्ली अजय गॅँग अखेर मोक्याच्या कचाटय़ात सापडली. वास्तविक 2014 पासून विविध गुन्हेगारी कारवायांत गॅँगचा सहभाग होता. गॅँगमधील सातजणांवर पोलीस अधीक्षकांनी मोक्का कारवाई केली आहे.
ओन्ली अजय गॅँगमध्ये अजय उर्फ अजित पांडुरंग खोत (वय 23, रा. टिंबर एरिया, सांगली), विकी प्रशांत पवार (वय 23), कुणाल प्रशांत पवार (वय 22), अमोल गंगाप्पा कुंचीकोरवी (वय 28), अर्जुन हणमंत पवार (वय 22, चौघेही रा. वडर कॉलनी, उ. शिवाजीनगर, सांगली) आणि गणेश रामाप्पा ऐवळे (वय 36, रा. गोकुळनगर, गल्ली क्र. 2, सांगली), सुजित दादासा चंदनशिवे (वय 29, रा. उत्तर शिवाजीनगर, सांगली) यांचा समावेश आहे. सर्वजण सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, या गॅँगविरोधात सुमारे दहा वर्षांपासून पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. या गॅँगविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999घ्या कलमानुसार वाढीव कलमे लावून तपास करण्याचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी पोलीस अधीक्षक संदिप घुगे यांच्याकडे सादर केला होता. त्यांनी तपास प्रक्रिया मोक्का कायद्यान्वये करण्यात यावी, याकरिता कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे पाठविला होता. त्यास मंजुरी मिळाली आहे. सदरच्या कारवाईत पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सिद्धार्थ रुपनर, पोलीस कर्मचारी अमोल ऐवळे, दीपक गट्टे, बसवराज शिरगुप्पी, पूजा जगदाळे आदींनी सहभाग घेतला.