‘हा’ हिंदुस्थानी फलंदाज टी-20 ध्येही द्विशतक करू शकतो – ब्रॅड हॉग

3151

कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक करणे अवघड असते. फलंदाजाला खेळपट्टीवर बराच वेळ टिकून राहवे लागते. तसेच विविध गोलंदाजांचा सामना करावा लागतो. वनडे क्रिकेटमध्येही द्विशतक झळकावणे अवघड मानले जात होते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वन डे मध्ये पहिले द्विशतक केल्यानंतर अनेक फलंदाजांनी त्यानंतर द्विशतक केले. टी-20 प्रकारात द्विशतक करणे अशक्य वाटते. प्रत्येक संघाकडे फक्त 20 षटके म्हणजे 120 चेंडू असतात. सलामीच्या फलंदाजाला 60 चेंडू खोळायला मिळाले तरी द्विशतक होऊ शकत नाही. मात्र, ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगच्या मते टी-20 क्रिकेटमध्ये द्विशतक करणे शक्य आहे आणि अशी कामगिरी फक्त एकच हिंदुस्थानी फलंदाज करू शकतो, असे म्हटले आहे. आतापर्यंत टी-20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी कोणत्याही फलंदाजाला करता आलेली नाही.

टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा याने वनडे आणि कसोटीमध्ये द्विशतके केली आहेत. वनडेमध्ये त्याने तीन द्विशतके केली आहेत. टी-20 मध्ये 4 शतके करणारा तो एकमेव फलंदाज आहे. रोहितने ठरवले तर तो कोणत्याही चेंडूवर षटकार मारू शकतो. रोहितला त्याची लय सापडली तर तो कोणत्याही गोलंदाजाचा चांगलाच समाचार घेतो. लय सापडल्यावर कोणत्याही चेंडूवर षटकार मारण्याच्या त्याच्या या गुणामुळेच रोहितकडे टी-20 मध्येही द्विशतक करण्याची क्षमता आहे, असे हॉगचे म्हणणे आहे. आपीएलमध्ये रोहितच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाने सर्वाधिक 4 वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. कसोटी आणि वनडे मध्ये द्विशतक करणे अवघड वाटत असतानाही अनेक फलदाजांनी ती कामगिरी केली आहे. त्यामुळे टी-20 मध्ये अशक्य वाटणारी ही बाबही रोहित शक्य करू शकतो, असे हॉगने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या