‘ऑपरेशन 5 आईज’मुळे चीनचा बुरखा टराटरा फाटला, 5 देशांच्या गुप्तचर संस्थांनी वुहानचे रहस्य उलगडले

6336

जगभरात लाखो नागरिकांचा जीव घेणाऱ्या जीवघेण्या कोरोना विषाणूचा उगम चीनच्या वुहान प्रांतातील एका लॅबमधून झाल्याचा आरोप जगभरातील देश करत आहे. या वरील पडदा उठवण्यासाठी जगातील पाच प्रमुख देशांच्या गुप्तचर संस्था एकत्र आल्या आहेत. यासाठी या गुप्तचर संस्थांनी ‘ऑपरेशन 5 आईज’ (OPERATION 5-EYES) सुरू देखील केले आहे.

अमेरिकेची गुप्तचर संस्था ‘सीआयए’, ब्रिटनची गुप्तचर संस्था ‘एमआय-6’ यासह पाच देशांच्या गुप्तचर संस्थांनी चीनला जगासमोर नागडा करण्याचा विडाच उचलला आहे. या ऑपरेशनचे नाव  ‘ऑपरेशन 5 आईज’ (OPERATION 5-EYES) असे ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच एकाच वेळी पाच देशांच्या गुप्तचर संस्था एकत्र आल्या आहेत. या संस्था कोरोना पसरण्यात चीनची चुकी काय? वुहान लॅबचे रहस्य काय? चीनने जगाला माहिती देण्यास वेळ का घेतला? याबाबत खुलासा करतील.

या 5 गुप्तचर संस्था एकत्र
अमेरिका – सीआयए
इंग्लंड – एमआय-6
ऑस्ट्रेलिया – एएसआयएस
न्यूझीलंड – एनझेंडएसआयएस
कॅनडा – सीएसआयसी

काय आहे ‘5 आईज’?
‘5 आईज’ हे पाच देशांच्या गुप्तचर संस्थांचे नेटवर्क आहे. यात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा आणि इंग्लंडच्या गुप्तचर संस्था एकत्र आल्या आहेत. या नेटवर्कने काही कागदपत्रे तयार केली असून यात वुहान मधुन जगभरात कोरोना कसा पसरला याची पोलखोल करण्यात आली आहे. 15 पानांच्या या हा अहवाल आहे. हा अहवाल ऑस्ट्रेलियाचे वृत्तपत्र ‘द डेली टेलीग्राफ’मध्ये प्रसिद्ध झाला तेव्हा जगाला याचा सुगावा लागला.

काय आहे या अहवालात?
या अहवालात काही खुलासे करण्यात आले आहेत. पहिला खुलासा वुहानमधील लॅबमध्ये वटवाघूळ आणि अन्य प्राण्यांवर सुरू असलेल्या संशोधनाबाबत आहे. वुहान लॅबमध्ये 50 प्रकारचे विषाणू असून चीन जाणूनबुजून ते अधिक घातक बनवत आहे, असा दावा करण्यात आला आहे.

जिथे सुरुवात, तिथेच शेवट? चिनी शास्त्रज्ञांनी केला कोरोनावर औषध शोधल्याचा दावा

दुसरा खुलासा या लॅबमध्ये सुरू तयार होत असलेल्या व्हायरस बाबत आहे. ‘5 आईज’च्या लिक झालेल्या कागदपत्रात वुहान लॅबमध्ये ‘सार्स’ सारखे अनेक जीवघेणे विषाणू बनवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे नमूद केले आहे.  डॉ. शी यांनी मार्च 2019 ला जगाला धोक्याचा इशारा दिला होता. भविष्यात वटवाघूळमुळे पसरणाऱ्या व्हायरसवर नियंत्रण मिळवणे कठीण जाईल असे, डॉ. शी म्हणाले होते.

तिसरा खुलासा चीनने सॅम्पल लपवल्याबाबत आहे. चीनने ‘मर्स’ आणि ‘सार्स’ प्रमाणे कोविड-19 विषाणूची माहिती जगापासून लपवली. ज्या डॉक्टरांनी, पत्रकारांनी याबाबत खुलासा करण्याचा प्रयत्न केला त्यांना रहस्यमयरित्या गायब करण्यात आले. जगभरातल्या प्रयोगशाळांनी कोरोना विषाणूचे प्राथमिक सॅम्पल चीनला मागितले तेव्हा ते देण्यास चीनने नकार दिला.

चौथा खुलासा पेशंट झिरो गायब करण्याबाबत आहे. वुहान येथील लॅबमध्ये काम करणारी इंटर्न वो ह्वांग यान लिंग हिला सर्वात पहिल्यांदा कोरोना झाला होता. त्यामुळे तिला पेशंट झिरो बोलले जाते. मात्र चीनने तिलाच गायब करून टाकले. यामुळे जगाला रिसर्चसाठी विषाणूच्या सुरुवातीचे सॅम्पल मिळाले नाही.

दरम्यान, ‘5 आईज’ची कागदपत्रे लिक झाल्यापासून चीन बिथरला आहे. चीनने अमेरिकेलाही धमकी दिली. तसे ऑस्ट्रेलिया तील पर्यटन आणि शिक्षण उद्योग बरबाद करण्याची धमकी दिली. तसेच ऑस्ट्रेलियाकडून आयात मालावर अतिरिक्त कर लावला, तर काही वस्तूची आयात बंद केली. मात्र ऑस्ट्रेलियाने चीनच्या धमक्यांना भीक न घालता त्यांना जगासमोर नागडा करण्याचा विडा उचलला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या