मोदी सरकारच्या शेतकरी अन्यायाविरोधात सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवा, राहुल गांधी यांचे आवाहन

केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून शेतकऱयांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न पद्धतशीरपणे सुरू आहे. मोदी सरकारच्या काळात शेतकऱयांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आता सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवावा आणि शेतकरीविरोधी धोरणे-कायदे हाणून पाडा, असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे.

कृषी कायद्यातील बदलांना शेतकऱयांकडून मोठय़ा प्रमाणात विरोध होत आहे. देशभरात ठिकठिकाणी उग्र आंदोलने सुरू आहेत. सरकारविरोधातील शेतकऱयांची ही लढाई अधिक तीव्र करण्यासाठी काँग्रेसने ‘स्पीकअप फॉर फार्मर्स’ हे अभियान सुरू केले आहे. राहुल गांधी यांनी यासंदर्भातील एक व्हिडिओ ट्विटरवरून शेअर करत कृषी विधेयक मागे घेण्याची मागणी केली आहे.

केंद्रातील भाजप सरकार सातत्याने शेतकरीविरोधी धोरण राबवत आहे.  सत्तेत आल्यावर लगेच भूसंपादन कायद्यात बदल करून शेतकऱयांच्या जमिनी हडपण्याचा अध्यादेश आणला होता. त्या वेळी काँग्रेसने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वात शेतकऱयांची साथ देऊन त्यांना त्यांचा हक्क परत मिळवून दिला होता. आता पुन्हा शेतकऱयांच्या हितावरच भाजप सरकारने वार केला आहे. शेतकऱयांवर होणाऱया अन्यायाला वाचा पह्डण्यासाठी काँग्रेस पक्ष सज्ज झाला आहे. या लढाईत सर्वांनी एकत्र येऊन शेतकऱयांचा आवाज बुलंद करावा, असे आवाहन काँग्रेसने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या