समुद्रातील जलक्रीडांना रापण संघाचा विरोध

38

मालवणः मालवण दांडी व वायरी किनारपट्टीवर स्थानिक युवकांनी सुरु केलेल्या जलक्रीडा व्यवसायाला सिंधुदुर्ग जिल्हा श्रमजीवी रापण मच्छीमार संघ मालवणने विरोध दर्शविला आहे. याबाबत मच्छीमार संघाने शुक्रवारी (१९) सायंकाळी बंदर निरीक्षक,पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे.

मालवण समुद्र किनाऱ्यावर बांगडा, तारली,व करंबट, मासळीचा हंगाम सुरु आहे.देवागाब ते दांडी क्षेत्रात किनाऱ्यापासून पाच वावा पर्यंत ही मासळी थव्याने येत असताना या किनारपट्टी क्षेत्रात स्कुबा डायव्हिंग,केले जाते.मासेमारी आरक्षित क्षेत्रात जलक्रीडा सारख्या प्रकरण बंदी असताना कायद्याला न जुमानता जलक्रीडा प्रकार सुरु आहेत. त्यामुळे रापणीने कॅच केलेली मासळी पळून जात असल्याने येथील रापण व्यवसाय डबघाईला येईल अशी भीती मच्छीमारांनी निवेदनातून व्यक्त केली आहे. यावेळी कुबल रापण संघ,मेस्त रापण संघ, वाईरकर रापण संघ, भगत रापण संघ, टिकम रापण संघ, उभाटकर रापण संघ,व नारायण तोडणकर रापण संघाचे मच्छीमार उपस्थित होते,यावेळी नायब तहसीलदार धनश्री भालचीम यांना ही निवेदन देण्यात आले आहे. त्यात नौका व जलक्रीडा व्यावासायीकाना सूचना द्याव्यात अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यास शासन जबादार राहील असे मच्छीमारानी निवेदनात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या