
सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करण्यासाठी राज्य सरकारने जीआर काढला आहे. 6 सप्टेंबर रोजी हा जीआर काढण्यात आला असून 9 संस्थांना नोकरभरतीबाबतचे कंत्राट देण्यात आले आहे. राज्यातील तरुणांना देशोधडीला लावणारा हा निर्णय असल्याने तरुणांनो रस्त्यावर उतरून या शासन निर्णयाची होळी करा, आंदोलन करा असे आवाहन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
राज्यातील 5 लाख 14 हजार जागा भरण्याचे कंत्राट खासगी संस्थांना दिले गेले असल्याने जवळपास अडीच हजार कोटी रुपयाची लूटमार या संस्था करणार आहेत. त्यामुळे तरुणांनो आता पेटून उठा आणि शासन निर्णयाची होळी करा. सत्ताधाऱ्यांनी मर्जीतील कंपन्यांना तिजोरीची लूट करण्याची मोकळीक दिली आहे. याविरोधात रस्त्यावर उतरा, आंदोलन करा, जोपर्यंत जीआर मागे घेत नाही तोपर्यंत मागे हटू नका, असे वडेट्टीवार म्हणाले.
View this post on Instagram
सरकारने काढलेला हा जीआर लागू झाला तर तरुण उद्ध्वस्त होईल. आरक्षण संपेल, हुशार मुलांचे भविष्य टांगणीला लागेल. भाजपचा हा मोठा डाव आहे. भरती करण्यात आलेल्या तरुणांना भाजपचा प्रचार करायला लावतील. तरुणाईला उद्ध्वस्त करण्याचे पाप हे नालायक सरकार करत आहेत, असा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केला.
कंत्राटीकरणाविरोधात कामगार संघटना रस्त्यावर उतरणार, कपिल पाटील यांच्या उपस्थितीत बैठक