या मुलीचे पाय असे का दिसतायत ?

4313

काही गोष्टी अशा असतात ज्या बघूनही कळत नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही फोटोंमुळे अनेकदा बुचकळ्यात पडायला होतं. एक फोटो सध्या फेसबुकवर व्हायरल झाला आहे. ख्रिस्तोफर फेरी यांच्या फेसबुक खात्यावरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. हे नेमकं काय प्रकरण आहे ते जाणून घेण्याआधी हा फोटो बघा.

हा फोटो बारकाईने बघितल्यानंतरही अनेकांना काही कळालं नाहीये. फोटो बघणाऱ्यांना हेच वाटत राहातं की या मुलीच्या पायामध्ये व्यंग आहे. काहींना असं वाटलं होतं की या मुलीचे पाय अस्वलासारखे केसाळ आणि विचित्र आहेत. मात्र या मुलीने हातात काहीतरी धरलेले आहे हे सांगितलं की मग फोटोबाबतचा खुलासा होतो.

optical-illusion-popcorn-ph

या मुलीने हातामध्ये पॉपकॉर्नचं पाकीट धरलं असून जमिनीवरी गवताचा रंग आणि पिशवीतील पॉपकॉर्मचा रंग इतका बेमालूमपणे मिसळला आहे की हातामध्ये पिशवी आहे हेच कळत नाही. फोटोमधल्या रहस्याचा उलगडा झाल्यानंतर मुलीबाबत वाईट वाटणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू खुलते. ही मुलही सुदृढ असून तिला कोणतंही व्यंग नाही हे कळाल्याचा आनंद त्यांना होतो. फोटोतील आभासामुळे आपण कसे काय फसलो असा प्रश्नही लोकांना पडत असतो.

आपली प्रतिक्रिया द्या