अवयवदानात उदासीनता, फक्त 24 टक्के नागरिकांना अवयवदानाची इच्छा

376

भीती आणि पुरेशा जनजागृती अभावी देशातील केवळ 24 टक्के नागरिकांनी मृत्यूनंतर अवयवदान करण्याची इच्छा आहे. त्यातील फक्त 3 टक्के लोकांनी तशी नोंदणी केली आहे.

वार्की इनसाइट्सच्या सहकार्याने एडलवाइज टोकियो लाइफ इन्श्युरन्सने अवयवदानासंदर्भात संशोधन केले आहे.  त्या अहवालानुसार, 1565 लोकांपैकी 80टक्के लोकांना अवयवदान करणे या संकल्पनेची माहिती आहे. 67 टक्के लोकांच्या मते ते महत्त्वाचे आहे, पण केवळ 35 टक्के लोकांना या प्रक्रियेची कल्पना आहे. एडलवाइज टोकियो लाइफ इन्श्युरन्स कंपनीतर्फे नोव्हेंबर हा अवयवदान जागरुकता महिना म्हणून साजरा केला जातो. याअंतर्गत अभिनेता राहुल बोस याला सहभागी करून घेतले जाणार आहे.

संशोधनातील ठळक बाबी
अंदाजे 45 टक्के लोकांच्या मते त्यांचे कुटुंब अवयवदानाची परवानगी देत नाही.
45टक्क्यांहून अधिक लोकांना अवयवदान हा स्कॅम आहे, असे वाटते. हॉस्पिटल त्यांनी वचन दिलेल्या अवयवांहून अधिक अवयव काढून घेऊ शकते अशी त्यांना भीती वाटते.
डोळे, किडनी, हृदय आणि यकृताला सोडून लोकांना इतर कोणते अवयव दान केले जाऊ शकतात याची अजिबात माहिती नाही. 25टक्क्यांहून जास्त लोक असे मानतात की कोमामध्ये असतानाही अवयवदान करता येतात.
शरीराच्या चिरफाडीची भीती आणि एकदा नोंदणी केल्यावर मागे फिरण्याचा कोणताही पर्याय नसण्याची काळजी लोकांच्या निर्णय प्रक्रियेवर मोठा परिणाम करते.

दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या जवानांसाठी एडलवाइज टोकियो लाइफ इन्श्युरन्सने 10 लाखांचा निधी दिला आहे. एका छोटेखानी समारंभात विमा नियामक विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुभाष चंद्र खुंटिआ यांच्या हस्ते तेलंगणा आणि सिकंदराबाद आंध्रचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल आर. के. सिंग यांना धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी एडलवाइज फायनान्शियल सर्विसेसचे कार्यकारी संचालक रुजान पंजवानी, लाईफ इन्शुरन्सचे सुभ्रजीत मुखोपाध्याय, अभिषेक गुप्ता उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या