सैनिकांच्या सन्मानार्थ फ्लॅश मॉब

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून कांदिवलीमधील ग्रोवेल्स 101 मॉलमध्ये बोरिवलीच्या डॉ. एस. राधाकृष्णन शाळेच्या 85 पेक्षा जास्त मुलांनी सैनिकांच्या सन्मानार्थ ’बियॉंड द बाउंड्रीज – आर्म्ड फोर्सेस’ या विषयावर आधारित म्युझिकल फ्लॅश मॉब सादर केला. तब्बल 15 मिनिटे सादर केलेल्या या कार्यक्रमात विविध देशभक्तीपर गीतांवर नृत्य प्रस्तुत करण्यात आली. मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनीही या विद्यार्थ्यांना दाद देऊन त्यांचा उत्साह वाढवला.