कारनामा! ५७५ टनाचे विमान ओढत गिनिज बुकात नोंद

24

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लग्झरी आणि आत्यधूनिक कार बनवणाऱ्या जर्मनिच्या पोर्श कंपनीच्या नावावर एक अतुलनीय विक्रम जमा झाला आहे. पोर्स कंपनीच्या कयन कारनं जगातील सर्वाधिक वजनाचे विमान ओढून दाखवलं आहे.

फ्रान्सच्या आत्यधूनिक उपकरणाच्या सहाय्यानं ए-३८० विमानाला ओढून दाखवत नवा किर्तीमान नावावर केला आहे. ४.५ मीटर लांबीच्या या कारला विमानासोबत जोडण्यात आलं होतं. ए-३८० विमानाचं एकून वजन ५७५ टन म्हणजे १,२६८,००० किलो एवढे आहे.

पाहा व्हिडिओ :

कंपनी व्यवस्थापनानं याबाबत बोलताना सांगितलं की, कारची चाचणी घेण्यासाठी असा पर्याय याआधी कधीही निवडण्यात आला नाही. त्यामुळे कारचा हा कारनामा नक्कीच सुखद आहे.

आपली प्रतिक्रिया द्या