धाराशिव- 24 तासात 33 कोरोना पॉझिटीव्ह, तात्पुरत्या कारागृहातील 6 कर्मचाऱ्यांसह 11 बंदींना कोरोना

धाराशिव जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा चिंता वाढविणारा आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात तब्बल 33 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 418 झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील धाराशिवसह अनेक नगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊन करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रुग्ण वाढीचा वेग हा जिल्ह्यातील नागरीकांना काळजीत टाकणारा आहे. मागील 24 तासात जिल्ह्यातील 33 कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यामध्ये दिनांक 12 जुलै रोजी पेंडींग असलेल्या 98 स्वॅबपैकी 13 स्वॅब पॉझिटीव्ह, 66 निगेटीव्ह तर 16 अनिर्णित तर 3 रिजेक्ट आले आहेत. हा रिपोर्ट जिल्हा रुग्णालयास रात्री उशिरा प्राप्त झाला आहे.

पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये धाराशिव शहरातील 7 रुग्णा असून हे सर्व रुग्ण शहरातील माळी गल्ली भागातील आहेत. 3 रुग्ण हे वाशी तालुक्यातील 1 तेरखेडा तर 2 पार्डी येथील आहेत. तुळजापूर तालुक्यातील 3 रुग्ण असून सावरगाव येथील 2 रुग्ण असून एक तुळजापूर शहरातील आहे. धाराशिव जिल्ह्यातील परंतू बाहेर जिल्ह्यात पॉझिटीव्ह निघालेल्या रुग्णांची संख्या 3 आहे.

येथील सामान्य रुग्णालयात रॅपिड अँटीजेन टेस्ट किट्स उपलब्ध झाल्यामुळे, त्या माध्यमातून धाराशिव येथील तात्पुरत्या कारागृहातील 58 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 17 जण पॉजिटीव्ह आले आहेत. यामध्ये 6 कारागृह कर्मचारी तर 11 कारागृह बंदीचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 33 रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे.

जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 418 झाली असून आत्तापर्यंत अडीचशे रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध कोवीड रुग्णालयात 151 जणांवर उपचार सुरु असून जिल्ह्यातील कोरोना बळीचा आकडा 17 झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या