धाराशिव जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दोन हजाराच्या पुढे

789

धाराशिव जिल्ह्यात आज शुक्रवार, 7 ऑगस्ट रोजी 130 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 30 झाली असून 652 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. 1 हजार 315 रुग्णांवर जिल्ह्यातील विविध कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

धाराशिव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच धाराशिव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपकेंद्रात संशयित रुग्णांचे 355 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी 318 स्वॅबचा तपासणी अहवाल जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाला आहे. यामध्ये 152 निगेटीव्ह, 130 पॉझिटीव्ह, 36 अहवाल अनिर्णित तर 37 अहवाल प्रलंबीत आहेत.

पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये धाराशिव तालुक्यात 18, तुळजापूर 48, उमरगा 27, कळंब 28, परंडा 07, लोहारा 1 तर वाशी तालुक्यात 1 पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आला आहेत. यामध्ये धाराशिव शहरातील समता नगर मध्ये 5, भुमी अभिलेख कार्यालयातील 3. तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे 2, अणदूर येथे 7, हडको 4, तुळजाई नगर 5 रुग्ण आढळले आहेत. उमरगा तालुक्यातही कोरोना रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. यामध्ये मुरुम 6, पतंगे रोड 6, बालाजी नगर 9 तर कळंब तालुक्यात रत्नापूर येथे तब्बल 17 कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 हजार 30 झाली असून 652 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. 1 हजार 315 रुग्णांवर जिल्ह्यातील विविध कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कळंब तालुक्यातील दत्त नगर येथील तसेच धाराशिव तालुक्यातील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे 63 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या