कळंब शहरात कोरोनाचे आठ नवे रुग्ण

1413

धाराशिव जिल्हयातील कळंब शहरात मुंबई कुर्ला येथुन आलेल्या आठ जणांना शुक्रवारी क्वारंटाईन करुन स्वॅब घेतले असता पाच जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत तर तीन जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. यामुळे कळंब शहरवासीयांना मोठा धक्का बसला असुन मोठी खळबळ माजली आहे. तालुक्यात शिराढोण येथील एक रूग्ण पॉझिटिव्ह निघाला असून कोरोना पॉझिटिव्हची संख्या तालुक्यात एकुण चौदा झाली आहे.

आज शहरातील एका तरुणाने कोरोनावर मात केल्याची सुखद बातमी आली असतानाच शुक्रवारी मुंबई कुर्ला येथून कळंब शहरातील पुनर्वसन सावरगाव मधील रहिवासी असणारे आठ जण प्रायव्हेट ट्रॅक्सीने आले होते. त्यांना आयटीआयमध्ये क्वारंटाईन करून त्यांचे स्वॅब घेऊन लातूर येथील वैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील दोन महिला, दोन पुरुष, एक मुलगी या पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून तीन जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. जीवन वायदंडे यांनी दिली. तर शिराढोण येथील एका व्यक्तीचा स्वॅब धाराशिव येथील रुग्णालयात घेण्यात आला होता. तो देखील पॉझिटिव्ह आल्याने तालुक्याला मोठा हादरा बसला आहे. शहरात आज एकदम पाच अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरवासीयांत मोठी खळबळ माजली आहे. शहरातील कंटेंटमेंट झोनमध्ये दहा जूनपर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या