परराज्यांतील विद्यार्थ्यांनाही आता वैद्यकीय प्रवेश मिळणार

10

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्याबाहेर एसएससी आणि राज्यातून बारावी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थांचे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज स्वीकारा, असे निर्देश न्यायमूर्ती मोहता आणि न्यायमूर्ती कोतवाल यांच्या खंडपीठाने वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाला (डीएमईआर) दिले.

महाराष्ट्रातील शाळेतून दहावीची परीक्षा उत्तीर्ण न झाल्याच्या मुद्द्य़ावर बोट ठेवून वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी अपात्र ठरवण्याच्या धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला. या धोरणाविरोधात नऊ विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन आव्हान याचिका दाखल केली. यावेळी न्यायालयाने परराज्यातून दहावी उत्तीर्ण होऊन आलेल्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन वैद्यकीय प्रवेश देण्याचे निर्देश डीएमईआरला दिले.

आपली प्रतिक्रिया द्या