ओटीटीवरील मराठी चित्रपटांनाही अनुदान द्या!

269

लॉकडाऊनमुळे ज्या निर्मात्यांचे चित्रपट थिएटरऐवजी थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले आहेत. अशा मराठी चित्रपटांचादेखील समावेश अनुदान योजनेत करावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने नुकतीच सांस्कृतिक मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ओटीटीवर मराठी चित्रपटांचा निर्मिती खर्चदेखील वसूल होत नाही, अशी निर्मात्यांची तक्रार आहे. महाराष्ट्र शासनाच्या जीआरनुसार थिएटरमध्ये रिलीज (10आठवडे) झालेल्या चित्रपटांनाच अनुदान मिळू शकणार आहे. या पार्श्वभूमीवर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज कराव्या लागलेल्या चित्रपटांना आपण अनुदान योजनेत सामावून घ्यावे, जेणेवरून त्या चित्रपटाच्या निर्मात्यांना हातभार लागेल व ते आणखी चित्रपट निर्मिती करू शकतील, अशी मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा’चे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या