…म्हणून IPL मध्ये घेतले नाही, वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूचा आरोप

45

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आयपीएल-२०१८साठी बेंगळुरूमधील लिलाव पार पडले असून आणखी काही दिवसांत आयपीएलचे सामनेही सुरू होतील. या लिलावामध्ये हिंदुस्थानला अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या उन्मुक्त चंद या खेळाडूकडे दुर्लक्ष करण्यात आले. एकाही संघाने त्याला खरेदी करण्यास रुची दाखवली नाही. यामागील कारण उन्मुक्तने स्वत:च स्पष्ट केले आहे. २४ वर्षीय या खेळाडूने आपल्यासोबत राजकारण करण्यात आले असून मला बळीचा बकरा बनवण्यात आल्याचा आरोप केला आहे.

उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली खेळताना हिंदुस्थानच्या युवा संघाने २०१२मध्ये अंडर-१९ विश्वचषक जिंकला होता. सध्या देवधर ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या उन्मक्तने एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना आपल्याला लिलावामध्ये का खरेदी करण्यात आले नाही यामागील कारणांचा उलगडा केला आहे. दिल्लीच्या संघाने २०१६-१७मध्ये कोणतेही कारण न देता अचानक संघातून बाहेर काढले होते, असा आरोपही उन्मुक्तने केला. त्यामुळे मला धक्का बसला होता. दिल्ली संघातील राजकारणामुळे मला संघातून बाहेर काढण्यात आले असा आरोप उन्मुक्तने केला.

आपली प्रतिक्रिया द्या