पाचशे रुपयांच्या दोन वेगळ्या नोटा, संसदेत राडा

31

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नोटाबंदीनंतरचा गोंधळ अजूनही कायम असून याचे पडसाद आज (मंगळवारी) संसदेतही उमटले. पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा संसदेत दाखवत नोटांचा आकार आणि वैशिष्ट्ये वेगवेगळी असल्याचा आरोप कपिल सिब्बल यांनी केला. नोटाबंदी म्हणजे शतकातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोपही विरोधकांनी केला. विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज अनेक वेळा तहकूब करावे लागले.

जदयू आणि काँग्रेसच्या खासदारांनी मिळून राज्यसभेत जोरदार घोषणाबाजी केली. जदयू नेते शरद यादव आणि कपिल सिब्बल यांनी संसदेत पाचशे रुपयांच्या नोटांच्या झेरॉक्स दाखवल्या. मी नोटांच्या झेरॉक्सवर सह्या करून देण्यासही तयार आहे. तसेच जगातील कोणत्याही देशात एकाच मूल्याच्या दोन वेगवेगळ्या आकाराच्या नोटा अस्तित्वात नाही असेही शरद यादव म्हणाले. तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन यांनीही सभागृहात पाचशे रुपयांच्या नव्या नोटा दाखवत त्यांच्यात फरक असल्याचे सांगितले.

kapil-sansad

विरोधकांच्या आरोपांदरम्यान अर्थमंत्री अरूण जेटली यांनी अधिक स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे चिडलेल्या कपिल सिब्बल यांनी, सरकारने छापलेल्या नव्या नोटांपैकी एक नोट ही सत्ताधाऱ्यांसाठी तर दुसरी नोट ही इतरांसाठी आहे, असा आरोप केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या