900 कलाकारांनंतर देशभरातील 400 लेखकांचा मोदींना पाठींबा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

चित्रपट, नाटक आणि कला क्षेत्रातील 900 कलाकारांनंतर आता साहित्य क्षेत्रातील 400 लेखकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा देत त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. देशाची अखंडता, सुरक्षा, स्वाभिमान आणि विकासासाठीमोदींना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी देशातील सर्व मतदारांना केले आहे. प्रसिद्ध साहित्यिक नरेंद्र कोहली, चित्रा मुद्गल, सूर्यकांत बालीसह देशभरातील 400 पेक्षा जास्त साहित्यिक आणि बुद्धिवादी मोदींच्या पाठी उभे राहिले आहेत.

‘कमकुवत’ नाही ‘मजबूत’ सरकार हवे, 900 कलाकार मोदींच्या समर्थनार्थ मैदानात

देशातील साहित्यिक एका बॅनरखाली एकत्र आहे आहेत. भारतीय साहित्यिक संघटनेने एक संयुक्त पत्र जारी करत म्हटले की, ‘लोकशाहीमध्ये राज्यघटनेला सर्वाधिक महत्त्व आहे. त्यामुळे आम्ही सर्व साहित्यिक देशवासियांना आवाहन करतो की आपले अमुल्य मत देशाची अखंडता, सुरक्षितता, स्वाभिमान, सर्वांगीन विकासासाठी द्यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरात देशाची प्रतिष्ठ वाढवण्यासाठी झटत आहेत. राष्ट्रीय सुरक्षेसाठी प्रतिबद्ध आहेत. तळागाळापर्यंत विकासाचा प्रवाह घेऊन जाणारे नेते म्हणून त्यांची गणना केली जाते.’

प्रसिद्ध साहित्यिक नरेंद्र कोहली यावेळी म्हणाले की, लेखक स्वतंत्र मताचा असतो, परंतु आमचे विरोधक एकत्र होत आहेत. ते म्हणतात येथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, परंतु सत्य हे आहे की जेवढे स्वातंत्र्य येथे आहे ते जगात कोठेही नाही. देशहितासाठी आम्हाला योग्य व्यक्ती निवडून देणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

journalist-modi

याआधी अमोल पालेकर, नसरुद्दीन शहा, गिरीश कर्नाड, उशा गांगुली यासह चित्रपट आणि कला, नाटक क्षेत्रातील 600 पेक्षा जास्त कलाकारांनी मोदींविरोधात मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर शंकर महादेवन, विवेक ओबेराय, पंडीत जसराज, रिता गांगुली, कोयना मित्रा, अनुराधा पौडवाल, हंस राज हंस यासह चित्रपट आणि कला क्षेत्रातील 900 पेक्षा जास्त दिग्गज ‘नेशन फर्स्ट’ या बॅनरखाली एकत्र आले आणि मोदींना मतदान करण्याचे आवाहन केले. आता आणखी 400 साहित्यिक मोदींच्या बाजूने उभे राहिले आहेत.