अमित शहांकडून CAA वर चर्चेचे आवाहन; ओवेसी, मायावती, अखिलेश यादवकडून स्विकार

1004
amit-shah

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावर चर्चेचे आवाहन केले होते. त्यावर एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असादुद्दीन ओवेसी, बसप अध्यक्ष मायावती आणि सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी शहा यांचे आवाहन स्विकारले असून चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले आहे.

नागरिकत्व कायद्यावरून देशभरात गदारोळ सुरू आहे. हा कायदा मागे घ्यावा म्हणून विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने केली आहेत. असे असले तरी हा कायदा मागे घेणार नाही अशी ठाम भुमिका गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली आहे. तसेच या कायद्यावर चर्चा करण्यासाठी शहा यांनी विरोधी पक्षातील राहुल गांधी, ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांना आवाहन केले होते.

यावर ओवेसी यांनी टीका करत आमच्याशी चर्चा करा असे म्हणत हे आवाहन स्विकारले आहे. तसेच बसपच्या अध्यक्षा मायावती यांनी ट्विट करून म्हटले की, लखनऊमध्ये CAA विरोधात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात सरकारने नागरिकत्व कायद्यावर चर्चा करू असे मायावतींनी म्हटले आहे.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव यांनीही हे आवाहन स्विकारले आहे. तसेच सरकारने फक्त नागरिकत्व कायदा आणि विकासावर चर्चा झाली पाहिजे असेही यादव म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या