गुड न्युज! ‘ऑक्सफर्ड’ची कोरोना लस चाचणी दुसऱ्या टप्प्यात

1246

अवघ्या जगाला लॉकडाऊन करणाऱ्या कोरोना व्हायरसवरील लस शोधण्यासठी ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. लस चाचणीच्या दुसऱ्या टप्प्याकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे. जगासाठी ही गुड न्युज आहे.

ऑक्सफर्ड व्हॅकसीन ग्रुपचे प्रमुख ऍण्ड्रीव्ह पोलार्ड यांनी याबाबत माहिती दिली. 10260 प्रौढ आणि मुलांवर पुढील लस चाचणी घेण्यात येईल. आतापर्यंत चाचणीचा योग्य प्रतिसाद मिळत आहे. दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला निष्कर्ष सप्टेंबरमध्ये मिळेल. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात मोठ्या समुहावर चाचणी घेण्यात येईल. 18 वर्षांवरील नागरिकांवरही चाचणी होणार असून, कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असणार आहे.

बिजिंगमध्येही चाचणीचा पहिला टप्पा यशस्वी

ज्या देशातून कोरोना व्हायरसची उत्पत्ती झाली. त्या चीनमध्येही लस चाचणीचा पहिला टप्पा यशस्वी झाल्याचे वृत्त अमेरिकेच्या न्युयॉर्क टाइम्सने दिले आहे. बिजिंगच्या प्रयोगशाळेत एडी-5 ही लस विकसित केली जात आहे. मानवी पेशींमध्ये कोरोनाचा प्रतिबंध करण्याची क्षमता यावर प्रयोग सुरू आहे. 18 ते 60 वयोगटातील 108 नागरिकांवर चाचणी घेण्यात आली. पेशींमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढल्यानंतर कोविड-19 चा प्रतिबंध होऊ शकतो असा हा प्रयोग आहे.

आपली प्रतिक्रिया द्या