भाभा रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत

कुर्ला येथील खान बहादूर भागा रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याच्या तक्रारींसदर्भात आमदार मंगेश कुडाळकर यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली. त्यांना या संदर्भातील  निवेदन दिल्यानंतर शाखाप्रमुख कमलाकर बनेस, समाजसेवक अनिल गलगली, किरण दामले यांच्यासह रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. उषा शर्मा यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी ऑक्सिजन टाकीचे काम लवकरात लवकर दुरुस्त करून घेण्यास सांगण्यात आले. त्यानुसार ऑक्सिजन टाकी दुरुस्त करण्यात आली असून यामुळे रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा सुरळीस झाला असल्याचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या