चिदंबरम यांचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला

615

माजी केंद्रीय अर्थमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा आयएनएक्स मीडिया प्रकरणातील जामीन अर्ज आज पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चिदंबरम यांना दिलासा मिळालेला नाही.

पी. चिंदबरम यांना 21 ऑगस्टला सीबीआयने आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटक केली होती. तेव्हापासून आतापर्यंत एकदाही त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केलेला नाही. सतत त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली जात आहे. ते गेल्या 85 दिवसांपासून तिहार तुरुंगात कैद आहेत. शुक्रवारी देखील दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

न्यायमूर्ती सुरेश कैत यांनी चिदंबरम यांना जामीन देण्यास नकार दिला आहे. ‘चिदंबरम यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे असून आयएनएक्स मीडिया प्रकरणात ते मुख्य आरोपी आहेत. जामीन हा त्यांचा अधिकार आहे. मात्र त्यांना जामीन देणे हे व्यापक जनहिताच्या विरोधात असेल’, असे न्यायमूर्ती कैत यांनी यावेळी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या