खेळाचा आनंद घ्या! ऑलिम्पियन पी. व्ही. सिंधूचा युवकांसाठी संदेश

289
pv-sindhu-2

कोणत्याही खेळामध्ये जीत-हार ही असतेच. पण अंतिम निकालाकडे जास्त लक्ष न देता आपण खेळाचा आनंद घ्यायला शिकायला हवे, असा संदेश रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिने देशातील युवा खेळाडूंना ‘फिट इंडिया’ मोहिमेच्या माध्यमातून दिला आहे.

हिंदुस्थानात शालेय स्तरापासून खेळाची सुरूवात होणे गरजेचे आहे. दिवसाला अर्धा तास कोणताही खेळ खेळल्यास त्याचा फायदा नक्कीच होतो. शाळांमधील शिक्षणासोबत खेळालाही तेवढेच महत्त्व आहे. खेळामुळे भविष्यात फिटनेसबाबत कोणतीही तक्रार जाणवणार नाही, असे पी व्ही सिंधू हिने यावेळी आवर्जून सांगितले.

पालकांनीही पुढाकार घ्यावा – सुनील छेत्री
हिंदुस्थानचा अनुभवी फुटबॉलपटू सुनील छेत्री यानेही पालकांना आवाहन करताना म्हटले की, मुलांना ज्या खेळाची आवड आहे, त्यामध्ये त्यांना खेळण्याची परवानगी द्या. त्यांना खेळाचा मनमुराद आनंद लुटू द्या. कोणताही दबाव त्यांच्यावर टाकू नका. मला माझ्या पालकांनी फुटबॉल खेळायला दिले. त्यामुळेच मला इथपर्यंत मजल मारता आली, असेही तो पुढे म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या