पिकासोच्या 89 वर्षांपूर्वीच्या चित्राची 700 कोटींना विक्री!

जगप्रसिद्ध स्पॅनिश चित्रकार पाब्लो पिकासो यांची चित्रे कायमच चर्चेचा विषय ठरली आहेत. अलिकडेच पिकासो यांच्या 1932 साली काढलेल्या चित्राचा चक्क 103.4 मिलियन डॉलरला म्हणजेच सुमारे 700 कोटी रुपयांना लिलाव करण्यात आला आहे. न्यूर्याकमध्ये हा लिलाव पार पडला.

खिडकीवर बसलेल्या मेरी थेरेस या महिलेचं हे चित्र आहे. 1932मध्ये रेखाटण्यात आलेलं हे चित्र 90 मिलियन डॉलरला विकलं गेलं असून 19 मिनिटांच्या बोलीमध्ये त्याची निवड करण्यात आली आहे. बोली लागल्यानंतर त्याची रक्कम व कमिशन मिळून या चित्राची किंमत 103.4 मिलियन डॉलर झाली आहे. ऑक्शन हाऊसने ही माहिती दिली आहे. कोरोनामुळे आर्थिक संकट असतानाही पिकासो यांच्या चित्राला विक्रमी बोली लागली आहे.

आठ वर्षांत मिळाली दुप्पट किंमत

हे चित्र आठ वर्षांपूर्वी लंडनमध्ये 28.6 मिलियन पाऊंड म्हणजे जवळपास 44.8 मिलियन डॉलरला खरेदी करण्यात आले होते. यापूर्वीदेखील पिकासोच्या पाच कलाकृतींची अशीच 100 मिलियन डॉलरच्या घरात विक्री झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या