ऐतिहासिक! पद्म पुरस्कारासाठी नवदुर्गांची शिफारस

379

क्रीडा मंत्रालयाने यंदाच्या पद्म पुरस्कारांसाठी केलेली शिफारस ही खऱ्या अर्थाने ऐतिहासिक म्हणावी लागेल. क्रीडा मंत्रालयाने या पुरस्कारांसाठी 9 खेळाडूंची नावे सुचवली आहेत. विशेष बाब ही आहे की या सगळ्या महिला खेळाडू आहेत.

 देशातील मानाच्या पुरस्कारांमध्ये भारतरत्न या पुरस्कारानंतर पद्म पुरस्कारांचा नंबर लागतो. यामुळे हा पुरस्कार मिळणं ही अभिमानाची गोष्ट मानली जाते. आतापर्यंत पद्मविभूषण हा पुरस्कार तीन खेळाडूंना देण्यात आला आहे. ज्यामध्ये विश्वनाथन आनंद(2007), सचिन तेंडुलकर (2008) आणि गिर्यारोहक सर एडमंड हिली (2008) या वर्षी या पुरस्कारासाठीही महिला खेळाडूचे नाव सुचवण्यात आले आहे.

क्रीडा मंत्रालयाने ही नावे गृहमंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या पद्म पुरस्कार निवड समितीकडे पाठवली आहे. या पुरस्कारांची घोषणा स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 25 जानेवारी 2020 ला होणार आहे. या पुरस्कारांसाठी कोणाकोणाची शिफारस केली आहे ते या फोटो गॅलरीमध्ये पाहा.

 

आपली प्रतिक्रिया द्या