119 नामांकित व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर; राज्यातील सहा जणांचा समावेश

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च नागरी सन्मान समजले जाणारे पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. याअंतर्गत पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत. 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारने पद्म पुरस्काराने सन्मानित केल्या जाणाऱ्या व्यक्तींची नावे जाहीर केली आहेत. या वेळी 119 लोकांना पद्म पुरस्कार मिळणार आहे. यात 7 पद्म विभूषण, 10 पद्मभूषण आणि 102 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.

आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांना मरणोत्तर पद्मभूषण देण्यात येईल. जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे, गायक एस.पी. बालासुब्रमण्यम (मरणोत्तर), सुदर्शन साहू, पुरातत्वशास्त्रज्ञ बीबी लाल यांना पद्म विभूषणने सन्मानित केले जाईल.

महाराष्ट्रातील पाच मान्यवरांना ‘पद्मश्री’

ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, प्रसिद्ध लेखक नामदेव कांबळे, चित्रकथी कला आणि कळसुत्री बाहुल्यांची कला जतन करणारे सिंधुदुर्ग जिह्यातील परशुराम आत्माराम गंगावणे, ज्येष्ठ समाजसेवक गिरीष प्रभुणे, उद्योगपती जसवंतीबेन जमनादास पोपट यांना ‘पद्मश्री’ नागरी सन्मान जाहीर झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे चंद्रकांत संभाजी पांडव (दिल्ली), अमेरिकेतील लेखक श्रीकांत दातार यांचाही ‘पद्मश्री’ने सन्मान करण्यात येणार आहे. पद्म पुरस्कारांनी सन्मानित महाराष्ट्रातील व्यक्तींचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. या सर्वांनी आपापल्या क्षेत्रांमध्ये आदर्श निर्माण केला असून हे नव्या पिढीला निश्चितपणे प्रेरणादायी आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या