पद्मश्री विजेते निर्मल सिंग खालसा यांचा कोरोना व्हायरसने मृत्यू

696

देशातील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या पद्मश्री पुरस्काराचे मानकरी व सुवर्ण मंदिराचे माजी हजुरी रागी निर्मल सिंग खालसा यांचे कोरोना व्हायरसमुळे धन झाले आहे. ते 62 वर्षांचे होते.

निर्मल सिंग हे नुकतेच इंग्लंडवरून परतले होते. तेथून आल्यानंतर त्यांच्यात कोरोनाची लक्षण दिसून आल्याने त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर गुरुनानक देव रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र गुरुवारी पहाटे साडे चारच्या सुमारास त्यांची प्रकृती खालावली व त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान सिंग यांनी इंग्लंडवरून परतल्यानंतर दिल्लीत एक धार्मिक सभा देखील घेतली होती. त्यामुळे आता त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा पोलीस शोध घेत आहेत. निर्मल सिंग खालसा यांना 2009 मध्ये केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार प्रदान केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या