घुमर गाणं नव्या स्वरुपात रिलीज; आता दिसणार नाही दीपिकाची कंबर

38

सामना ऑनलाईन । मुंबई

संजय लीला भन्साळींचा बहुचर्चित आणि वादग्रस्त ‘पद्मावत’ सिनेमातील घुमर गाणं नव्याने प्रदर्शित करण्यात आलं आहे. प्रदर्शनाला होत असलेल्या विरोध पाहून भन्साळीं यांनी सिनेमात अनेक बदल केले. या नव्या बदलांसह सिनेमाच्या नव्या नावासह सिनेमाचं पोस्टर आधी रिलीज करण्यात आलं. त्यानंतर सिनेमाचा नवा डायलॉग प्रोमोही प्रदर्शित झाला आणि आता घुमर गाणं नव्या स्वरूपात प्रदर्शित करण्यात आलं आहे.

या गाण्यात आधी दीपिकाचं पोट आणि कंबर दिसत होतं. त्यामुळे या गाण्यालाही विरोध होत होता. मात्र आता नव्या गाण्यात दीपिकाचे पोट व कंबर झाकण्यात आली आहे. पद्मावतीला करणी सेनेचा कडाडून विरोध होता. विशेष म्हणजे दीपिकाच्या घुमर गाण्यावर त्यांनी आक्षेप घेतला होता. गाण्यातील दीपिकाचं अंगप्रदर्शन वगळ्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता ग्राफिक्सचा आधार घेत दीपिकाचं पोट आणि कंबर झाकण्यात आली आहे. आता एकूण ३०० कटसह सिनेमा येत्या २५ जानेवारील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या